सातारा जिल्ह्यात 298 जणांचा रिपोर्ट आला निगेटिव्ह तर एका बाधिताचा मृत्यु
सातारा दि. 1 : एन.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 298 नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यिचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
जांभ येथील बाधिताचा मृत्यु
आज पहाटे कोरेगाव तालुक्यातील जांभ येथील 33 वर्षीय पुरुषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला असून तो कोरोना बाधित असल्याचे खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
00000
No comments