Breaking News

आज 2 जणांना सोडले घरी; 148 जणांचे नमुने पाठविले तपासणीला



सातारा दि. 23 ( जि. मा. का ) : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा दाखल असलेल्या स्टाफ नर्स, खिंडवाडी सातारा येथिल 44 वर्षीय महिला व कोविड केअर केंद्र खावली येथील दाखल असलेल्या निशिगंधा कॉलनी बारवकर नगर, सातारा येथील 42 वर्षीय पुरुष असे एकूण 2 रुग्णांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
148 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातरा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 36, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 14, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 8, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 6, वाई 11, शिरवळ 13, पानमळेवाडी 3, दहिवडी 39 असे एकूण 148 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू
तसेच दि. 2 जून रोजी मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या ओझरे ता. जावली येथील 75 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.
00000

No comments