दैनिक गंधवार्ता वेबपोर्टलचे तीन दिवसात 15 K विव्हीअर्स
फलटण (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) - दैनिक गंधवार्ताच्या वेब पोर्टलला वाचकांनी अल्पावधीत लोकप्रिय केले असून तीन दिवसातच 15 K म्हणजेच पंधरा हजार पेक्षा जास्त विव्हीअर्स झाले आहेत. सरासरी दररोज 5 हजार युजर्स दैनिक गंधवार्ता पोर्टल ला भेट देत आहेत.
दिनांक 15 जून 2020 पासून सुरू झालेल्या दैनिक गंधवार्ता वेबपोर्टलला वाचक वर्गाने अल्पावधीतच प्रसिद्ध केले आहे. वास्तविक दि. 15 जून ते 120 जून पर्यंत दैनिक गंधवार्ता वेबपोर्टल अंडर-कन्स्ट्रक्शन होते आणि खऱ्या अर्थाने दि. 21 जून पासून सुरू झालेल्या या पोर्टलला दिनांक 21, 22 व 23 जून रोजी सरासरी 4800 नेटीझन्सनी भेट देऊन, तीन दिवसात दैनिक गंधवार्ता वेब पोर्टल ला भेट देणाऱ्या नेटिझन्सची संख्या 15 हजार पेक्षा जास्त केली आहे.
आकर्षक डिझाइन व उत्कृष्ट मांडणी असणाऱ्या दैनिक गंधवार्ता पोर्टल च्या बातम्या ही तितक्याच दर्जेदार आहेत अशा कमेंट्स दैनिक गंधवार्ता वेब पोर्टलला मिळू लागल्या आहेत. दि. 21 जून रोजी दैनिक गंधवार्ता वेब पोर्टलला 4733, 22 जून रोजी 4858 तर आज 4842 युजर्सनी दैनिक गंधवार्ता वेब पोर्टल ला भेट दिली. आणि दिनांक 15 जून पासून आज संयकाळी 7:30 वाजेपर्यंत 153509 जणांनी भेट दिली आहे, ही आकडेवारी गूगल द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोर्टल वरून घेण्यात आली आहे.
No comments