Breaking News

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण येथे 'इनोव्हेशन २के२६' व 'हॅकाथॉन २०२६'चा थरार; देशभरातील तंत्र-प्रतिभांचा फलटणच्या भूमीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गौरव!

The thrill of 'Innovation 2K26' and 'Hackathon 2026' at College of Engineering Phaltan; Tech talents from across the country were felicitated by Shrimant Ramraje Naik Nimbalkar in the land of Phaltan!

    फलटण  (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण येथे 'इनोव्हेशन २के२६' (पदवी व पदविका विभाग) आणि राष्ट्रीय स्तरावरील 'हॅकाथॉन २०२६' या तंत्रज्ञान व प्रकल्प स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धांमध्ये राज्यभरातील तसेच देशभरातील  नामांकित अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) संस्थांच्या ५४४ विद्यार्थ्यांच्या संघांनी (२३४८ विद्यार्थी) उस्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे व तांत्रिक कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवले.  फलटण तालुक्यातील ४५०० हुन अधिक विद्यार्थी, पालक, शेतकरी व नागरीकांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन प्रकल्प पाहीले.

    बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते तसेच श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालय गव्हर्निंग बॉडी सदस्य श्री. भोजराज नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम (सर), महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. मनोजकुमार दळवी उपस्थित होते.

    यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, "राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही फलटण शहरात स्वागत करतो, विद्यार्थ्यांनी नवनवीन क्षेत्रात केलेले प्रकल्प कौतुकास्पद आहेत व भविष्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी असे तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन अत्यंत आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर केवळ स्पर्धा जिंकण्यासाठी न करता तो समाजातील तळागाळातील समस्या सोडवण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी झाला पाहिजे. अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो व त्यांचा आत्मविश्वास वाढतो. या स्पर्धेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील यशस्वी वाटचालीस उज्वल शुभेच्छा!"

    'इनोव्हेशन २के२६' च्या पदवी (डिग्री) विभागात जे.एस.पी.एम.चे जे.एस.सी.ओ.ई. हडपसरचे विद्यार्थी प्रेम दास सुर्भी, श्रीवास पायल पाटील व प्रणव बुलबुले (प्रकल्प: वास्तविक जीवनातील समस्या) आणि मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग करवेनगर पुणेचे विद्यार्थी निखिल कांबळे, वेदान्त मोर्गे, आकांशा देशमुख व प्रियांका राऊत (प्रकल्प:  वारीदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित गर्दी व संसाधन व्यवस्थापन) यांनी संयुक्तपणे विजेतेपद पटकावले. तर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटणचे विद्यार्थी सोनम नीलेश सावंत, ज्ञानेश्वर दत्तात्रय चव्हाण, निकिता भीमराव शेळके व श्रेया कृष्णनाथ शिंदे (प्रकल्प: 'स्मार्ट कॉलेज बेल') आणि मुंबईच्या एस.आय.ई.एस. ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी यश थापर, सोहन राय, संस्कृती गोडसे व ओवी वाकचौरे (प्रकल्प: 'डिव्हाईन फ्युएल') हे उपविजेते ठरले. या विभागात विशेष पुरस्कारांमध्ये, सर्वोत्कृष्ट मजबूत रचनेचा (डिझाइन) पुरस्कार डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणेच्या चंदन राठोड, आदित्य करपे, पृथ्वीराज अनासे व श्रीरंग वाघ (प्रकल्प: 'ऑटोमॅटिक मल्ट्री व्हेजिटेबल ट्रान्सप्लांटर') यांना; सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख प्रवाहाचा (ट्रेंड) पुरस्कार ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूरच्या संग्राम मल्लिकार्जुन बालगावकर व सिद्धार्थ प्रभाकर खुब्बा (प्रकल्प: 'हायड्रोजन-पॉवर्ड प्रपल्शन सिस्टम') यांना; सामाजिक प्रभाव पुरस्कार एस.एस.व्ही.पी.एस. बी.एस. देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धुळेच्या चंचल राजेंद्र खैरमोड, वैभवी मनोहर पाटील, भाग्यश्री माधवराव पाटील व सिद्धी किरण पाटील (प्रकल्प: 'हेमिस्फेरिक सेल्फ-हीटेड टेंट') यांना; सर्वोत्कृष्ट नवकल्पना पुरस्कार विद्या प्रतिष्ठानचे कमलनायन बजाज इन्स्टिट्यूट बारामतीच्या यशराज धर्माधिकारी, सुजल चिरमे व हितेश राठोड (प्रकल्प: 'वेनो: अ हँडहेल्ड व्हेन डिटेक्शन डिव्हाइस') यांना, तर सर्वोत्कृष्ट कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंगचा (एआयएमएल) पुरस्कार मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व जेएसपीएम युनिव्हर्सिटी वाघोलीच्या श्रुती दळवी, वेदान्तिका महादिक व आदित्य धनावडे (प्रकल्प: 'ॲग्रीस्पिअर') यांनी पटकावला.

    राष्ट्रीय स्तरावरील 'हॅकाथॉन २के२६' स्पर्धेत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणेचे विद्यार्थी आदित्य पळे, सूर्यवंश शेळके व प्रतीक कासार सुब्रह्मण्यम (प्रकल्प: 'एआय-पॉवर्ड अंडरग्राउंड माईन सेफ्टी, मॉनिटरिंग अँड रेस्क्यू सिस्टम') आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणेचे विद्यार्थी हर्ष, रोहित, शम व आदित्य (प्रकल्प: 'अकातसुकी: वोनबिओल्ड' - महिला सुरक्षा) यांनी प्रथम विजेतेपद मिळवले. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग गारगोटीचे विद्यार्थी सुदर्शन लांजिले, विनयराज कोरे, ओंकार कांबळे व सोहम पाटील (प्रकल्प: 'स्मार्ट कम्युनिटी हेल्थ मॉनिटरिंग अँड अर्ली वॉर्निंग सिस्टम...') आणि एमएस रामय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बंगळुरूचे विद्यार्थी गतिक पाटील, अदिती सिन्हा, अनिका हिरेमठ व पुलिन चौधरी (प्रकल्प: 'ॲडाप्टिव्ह स्ट्रेस-इनॉक्युलेशन ट्रेनर...') हे उपविजेते ठरले. हॅकाथॉन मधील विशेष पुरस्कारांमध्ये, सर्वोत्कृष्ट विश्वासार्ह रचनेचा (डिझाइन) पुरस्कार नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पुणेच्या अनाव बाथे, कुशल खाडे, ज्ञानेश्वरी शितोळे व प्रीती चव्हाण (प्रकल्प: 'रिअल लाईफ प्रॉब्लेम्स') यांना; सर्वोत्कृष्ट मजबूत रचनेचा पुरस्कार आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विटाच्या साक्षी संतोष लुगाडे, शुभम माणिक जारे व तनिषा ईश्वर शिंदे (प्रकल्प: वादळ, ढगफुटी आणि महापुराची २ ते ६ तास आधी माहिती देणारी एआय प्रणाली) यांना; सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख प्रवाहाचा पुरस्कार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटणच्या भूमी देवकाते, ऐश्वर्या कदम व अंजली कदम (प्रकल्प: 'स्मार्ट रुरल हेल्थकेअर असिस्टंट') यांना; सामाजिक प्रभाव पुरस्कार विद्या प्रतिष्ठान बारामतीच्या आयुष निलेश शहा, वैष्णवी वैभव सानप, संचिता संदीप सुंदेचमुथा व ओम संजय गोरे (प्रकल्प: धोक्याच्या रेड झोन क्षेत्रांची ओळख व पुनर्वसन प्रणाली) यांना; सर्वोत्कृष्ट नवकल्पना पुरस्कार ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस नांदेडच्या समय पोवाडे, ऋतुजा राठोड, रेखा नागोराव येळके व वेदिका मोहन जाधव (प्रकल्प: 'एआय ह्युमन ॲक्टिव्हिटी रिकग्निशन...') यांना, तर सर्वोत्कृष्ट कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंगचा पुरस्कार पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी पुणेच्या सुजल सुपेकर, महेश खोसे, आयुष कुलकर्णी व नील चंदेल (प्रकल्प: शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ जोडणी व दर निश्चिती सुधारणा) यांनी संपादन केला.

    'इनोव्हेशन २के२६' च्या पदविका (डिप्लोमा) विभागात अशोकराव माने तंत्रनिकेतन वाठारच्या विद्यार्थिनी श्रुतिका एस. काशिद, तनिष्का बी. झूंझरगे, गायत्री ए. येडके व शुब्दा एम. आवटे (प्रकल्प: 'एआय पॉवर्ड व्हीलचेअर') आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेचे विद्यार्थी एशान शाह (प्रकल्प: 'सोटेन' - जलद हवाई प्रतिसाद प्रणाली) यांनी प्रथम विजेतेपद संपादन केले. परिक्रमा तंत्रनिकेतन काष्टीचे गौरव नगरकर, स्वप्निल गायकवाड, प्रणव कांबळे व तन्मय सोनवणे (प्रकल्प: 'आयओटी बेस्ड वायरलेस ईव्ही चार्जिंग सिस्टम') आणि फॅबटेक टेक्निकल कॅम्पस सांगोलाचे स्वप्नदीप चंद्रकांत जगधाने, प्रणव बाळू खटके, सुमित रामदास घटुकडे व सौरभ रमेश केळकर (प्रकल्प: 'स्मार्ट पॉवर स्टेशन') यांनी उपविजेतेपद पटकावले. पदविका विभागातील विशेष पुरस्कारांमध्ये, सर्वोत्कृष्ट मजबूत रचनेचा पुरस्कार एसव्हीपीएम्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी माळेगाव बुद्रुकच्या अवधूत पवार, पूजा भोपकर, ज्ञानेश्वरी बोराटे व शिंदे संस्कार (प्रकल्प: टाकाऊ प्लॅस्टिक व सिमेंट काँक्रीटचे शाश्वत सच्छिद्र रस्ते ठोकळे) यांना; सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख प्रवाहाचा पुरस्कार जील तंत्रनिकेतन पुणेच्या निशांत नंदकुमार उनवणे, शर्वरी सखाराम प्रमोद, अभिजित अशोक भंडारी व आदित्य कुणाल मलिक (प्रकल्प: 'कार्गोसेतू') यांना; सामाजिक प्रभाव पुरस्कार श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पनोरीच्या लवंड यश मोहन, बाबर अथर्व संतोष, कांबळे बजरंग श्रीकृष्ण व जाधव शिवेंद्र माधव (प्रकल्प: 'फोर व्हील स्टिअरिंग') यांना; सर्वोत्कृष्ट नवकल्पना पुरस्कार राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तंत्रनिकेतन लोहगाव पुणेच्या राज घडत, सुजल दुपारे, वेदिका थोरात व अनुष्का वाळके (प्रकल्प: रिमोट कंट्रोलने चालणारा व आवाजाने संवाद साधणारा स्मार्ट रोबोट) यांना, तर सर्वोत्कृष्ट कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंगचा पुरस्कार अमृतवाहिनी तंत्रनिकेतन संगमनेरच्या वैभव पवार, सार्थक उदमले, तन्वी कतारे व रुचिका देशमुख (प्रकल्प: 'माया' - महाविद्यालयीन सहाय्यक मानवरूपी रोबोट) यांनी पटकावला.

    या सर्व गुणवंत विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे फलटण एज्युकेशन सोसायटी चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटणचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. दळवी यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन केले.

No comments