‘रेट बघा मग खरेदी करा!’ SS मोबाईल्स व सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचा ७७७७ बक्षिसांचा महा लकी ड्रॉ ; पहिल्या बक्षिसात महिंद्रा थार, तर दुसऱ्या ड्रॉमध्ये स्विफ्ट कारची संधी!
फलटण : ‘रेट बघा मग खरेदी करा!’ या विश्वासार्ह घोषवाक्यासह गेली २७ वर्षे फलटणकरांच्या सेवेत कार्यरत असलेल्या SS मोबाईल्स आणि सूर्या इलेक्ट्रॉनिक्स, डी.एड. चौक, फलटण यांच्या वतीने यंदाच्या दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी तब्बल ७७७७ बक्षिसांचा महा लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय १५१ बक्षिसांचा आणखी एक विशेष लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला असून ग्राहकांना महिंद्रा थार आणि स्विफ्ट कार जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
ऑनलाईनपेक्षाही कमी दरात खरेदीची संधी
SS मोबाईल्स आणि सूर्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोबाईल तसेच विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी ऑनलाईनपेक्षाही कमी दरात करता येणार असल्याचा दावा संचालकांनी केला आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना शोरूममध्येच सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक खरेदीवर आकर्षक प्रीमियम गिफ्ट देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
७७७७ बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ
दिवाळी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ७७७७ बक्षिसांच्या महा लकी ड्रॉचे कूपन देण्यात येणार आहे. यामध्ये पहिले बक्षीस महिंद्रा थार गाडी, दुसरे बक्षीस १६ अॅक्टिवा, १३२ इलेक्ट्रिक बाईक, ४५० सायकली तसेच एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसह विविध आकर्षक बक्षिसांचा समावेश आहे.
१५१ बक्षिसांचा दुसरा लकी ड्रॉ
याशिवाय १५१ बक्षिसांचा स्वतंत्र लकी ड्रॉ देखील आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पहिले बक्षीस स्विफ्ट कार, दुसरे बक्षीस १० एलईडी टीव्ही, तिसरे बक्षीस फ्रिज, चौथे बक्षीस १० वॉशिंग मशीन आणि १० कुलर यांसह एकूण १५१ बक्षिसांचा समावेश आहे.
२७ वर्षांची विश्वासार्ह परंपरा, ग्राहकांना कमीत कमी दरात खरेदीची संधी, शोरूममध्येच मिळणारी सेवा आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी यामुळे SS मोबाईल्स आणि सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची यंदाची दिवाळी ऑफर ग्राहकांसाठी विशेष ठरणार आहे. त्यामुळे फलटण व परिसरातील ग्राहकांनी डी.एड. चौकातील शोरूमला भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ता : SS मोबाईल्स आणि सूर्या इलेक्ट्रॉनिक्स, डी.एड. चौक, फलटण.
संपर्क : 7028781500, 9271005555


No comments