Breaking News

उघड्यावर कचरा टाकल्यास ५०० रुपये दंड; फलटण नगरपरिषदेचा नागरिकांना इशारा

Rs 500 fine for throwing garbage in the open; Phaltan Municipal Council warns citizens

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ : शहरातील सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला तसेच मोकळ्या जागेत कचरा, खरकटे अन्न व राडारोडा टाकणाऱ्या नागरिकांवर फलटण नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. उघड्यावर कचरा टाकताना आढळल्यास संबंधित नागरिकाला ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

    शहरातील विविध ठिकाणी सार्वजनिक जागांवर कचरा टाकला जात असल्याचे नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास येत आहे. यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरत आहे. तसेच डास व माशांचा प्रादुर्भाव वाढण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे.

    नागरिकांनी यापुढे सार्वजनिक ठिकाणी अथवा उघड्यावर कचरा टाकू नये. घरातून निर्माण होणारा ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करून नगरपरिषदेच्या कचरा संकलन वाहनाकडेच द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी अथवा मोकळ्या जागेत उघड्यावर कचरा टाकताना नागरिक आढळल्यास नगरपरिषदेच्या लागू नियमांनुसार ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच यापुढे कोणतीही सूचना न देता कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.

    शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.

No comments