मठाचीवाडी व कांबळेश्वर येथे पानंद रस्त्यांच्या कामांचा रणजितदादांच्या हस्ते शुभारंभ
फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ नोव्हेंबर२०२६ - आज मुख्यमंत्री बळीराजा शेत-पानंद रस्ते योजना अंतर्गत मठाचीवाडी येथील कदम वस्ती ते महादेव मंदिर मार्गे शेलार मळा तसेच कांबळेश्वर येथील रेल्वे लाईन ते वाघ वस्ती या पानंद रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले.
या भूमिपूजन कार्यक्रमावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, अमरसिंह नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, नगरसेवक रोहित नागटिळे यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्यमंत्री बळीराजा शेत-पानंद रस्ते योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध होणार असून, शेतीमालाची वाहतूक, शेतीची कामे आणि दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. या रस्त्यांच्या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

No comments