Breaking News

साखरवाडीत लिंगभेद समानता, महिला सक्षमीकरण व पोषण आहाराबाबत जनजागृती; पथनाट्याद्वारे संदेश

Awareness about gender equality, women empowerment and nutrition in Sakharwadi; Message through street play

    साखरवाडी (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ : महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा मार्गदर्शित ओम साई लोकसंचालित साधन केंद्र फलटण, ग्रामपंचायत साखरवाडी व सावित्रीबाई फुले ग्रामसंघ साखरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी साखरवाडी येथे जेंडर व न्यूट्रिशन हेल्थ कार्यक्रमांतर्गत जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

    या कार्यक्रमांतर्गत गावपातळीवर लिंगभेद समानता, महिला सक्षमीकरण, आहार व पोषण तसेच स्त्री-पुरुषांच्या घर व संपत्तीवरील संयुक्त मालकी हक्क याविषयी जनजागृती करण्यात आली. आधार ग्रुप, आळजापूर यांच्या वतीने पथनाट्य सादर करून सामाजिक विषयांवर प्रभावी संदेश देण्यात आला. यावेळी महिलांची हिमोग्लोबिन तपासणीही करण्यात आली.

    कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत सदस्य हरीश गायकवाड, संग्राम अवतारे, तंटामुक्ती अध्यक्ष विकी भोसले, पत्रकार किसन भोसले, कार्यकारिणी सदस्य संगीता गायकवाड, नीलम धोंडगे, ओम साई लोकसंचालित साधन केंद्र फलटणच्या व्यवस्थापक शीला घाडगे, लेखापाल पूजा अडसूळ, उपजीविका सल्लागार सुशांत चोरमले, संयोगिनी दिपाली मोरे, सीआरपी वर्षा काकडे व वैशाली खलाटे उपस्थित होते.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खामगाव व साखरवाडी येथील महिला बचत गटांच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.

No comments