राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या फलटण शहराध्यक्षपदी आमिर भाई शेख
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.५ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या फलटण शहराध्यक्षपदी आमिर भाई शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे आणि कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन शहराच्या विविध भागांत संघटनात्मक कामकाजाला गती देण्यावर आगामी काळात भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आमिर भाई शेख यांच्या नियुक्तीचे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून स्वागत करण्यात आले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

No comments