Breaking News

आमदार सचिन पाटील यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध; महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांची टीका

Congress condemns MLA Sachin Patil's statement; Mahendra Suryavanshi (Bedke) criticizes

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ६ ऑगस्ट : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबाबत फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी निषेध व्यक्त केला आहे.

    प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, आमदार सचिन पाटील यांनी संबंधित प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेतली असती तर असे वक्तव्य केले नसते. संबंधित मजकूर हा हर्षवर्धन सपकाळ यांचे वैयक्तिक वक्तव्य नसून काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया (एक्स/ट्विटर) हँडलवरील पोस्ट असल्याचा दावा त्यांनी केला.

    यावेळी त्यांनी आमदार सचिन पाटील यांच्यावर विविध मुद्द्यांवर टीकाही केली. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत चौकशीची मागणी अद्याप करण्यात आली नसल्याचा आरोप करत, याबाबत विधानसभेत भूमिका मांडायला हवी होती, असे त्यांनी म्हटले.

    फलटण शहर व तालुक्यातील प्रलंबित प्रश्न, शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पालखी महामार्गाच्या कामाचा दर्जा, विजेचे खांब पडल्याच्या घटनेतील जखमींची विचारपूस तसेच शेतकरी आणि बेरोजगार युवकांचे प्रश्न याकडे आमदारांनी प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही सूर्यवंशी यांनी केली.

    अपुऱ्या माहितीच्या आधारे वक्तव्य करून आमदारांनी राजकीय अपरिपक्वता दाखविल्याचा आरोप करत, त्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने निषेध करीत असल्याचे सूर्यवंशी यांनी निवेदनात नमूद केले.

No comments