Breaking News

जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आनंदराव शितोळे यांचे निधन

Jai Bhavani Education Society Chairman Anandrao Shitole passes away

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२८ : जय भवानी एज्युकेशन सोसायटी, तिरकवाडीचे चेअरमन आनंदराव शितोळे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा रविवारी (दि. २८ जून) सकाळी ११ वाजता बुधवार पेठ येथील शितोळे मॅन्शन येथून निघाली. त्यानंतर फलटण येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    अंत्यसंस्कारावेळी राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात आला.

No comments