तडीपार आरोपीस फलटण शहर पोलीसांनी केले जेरबंद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - दिनांक ०७/०५/२०२६ रोजी सायंकाळी ०६.३० वाजताचे सुमारास फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद काळे हे त्यांचे डि.बी. पथकासह पोलीस ठाणे हददीत गस्त करीत असताना त्यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, पोलीस ठाणे अभिलेखावरील एक तडीपार इसम हा बीएसएनएल ऑफिस, फलटण परीसरात फिरत आहे, अशी माहिती प्राप्त झाल्याने नमुद पोलीस पथकाने फलटण बीएसएनएल ऑफिस समोरील रोडवर तडीपार इसमाचा शोध घेतला, असता संपुर्ण सातारा जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका, सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातुन दोन वर्षा करीता तडीपार असलेला इसम नामे सोनल गणेश इंगळे ऊर्फ ढोबळ्या वय २१ वर्षे, रा. आखरी रस्ता, मंगळवारपेठ फलटण, ता. फलटण, जि. सातारा हा नमुद पोलीस पथकास पाहुन पळून जाऊ लागला असता, पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. नमुद तडीपार इसमास फलटण शहर पोलीस ठाणेत आणुन त्याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधिक्षक सो सातारा, श्री विशाल खांबे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो फलटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी श्री अरविंद काळे, सपोनि नितीन शिंदे, पोहवा संतोष नाळे, पोकॉ जितेंद्र टिके, पोकॉ. अतुल बडे यांनी पुर्ण केली आहे.

No comments