Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कडून सोनगाव बंगला एमपीएससी पुस्तक संच भेट

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Festival Committee presents MPSC book set to Songaon Bungalow

    फलटण गंधवार्ता वृत्तसेवा दि.२ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2025 यांच्या वतीने बुद्ध जयंतीनिमित्त सोनगाव बंगला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेस एमपीएससी पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

    या कार्यक्रमाला आमदार सचिन कांबळे पाटील, नगराध्यक्ष समशेरदादा नाईक निंबाळकर, नगरसेवक आप्पा मांढरे, सचिन अहिवळे, रोहित नागटिळे, किरण राऊत, नगरसेविका सुपर्णा अहिवळे, मीनाताई काकडे, माजी नगरसेवक सनी अहिवळे,   हरीश काकडे, विकी बोके, मुकेश रणपिसे यांच्यासह अनेक समाजसेवक उपस्थित होते.

    सोनगाव बंगला येथे सनी मोरे आणि त्यांच्या सर्व सहकारी टीम तसेच ‘निळी तालीम मित्र मंडळ’ यांच्या वतीने बुद्ध जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे अन्नदान कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत या टीमकडून सातत्याने राबवले जाणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

    कार्यक्रमात ज्ञानदान आणि अन्नदान या दोन्ही उपक्रमांमुळे सामाजिक एकात्मता व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले.

No comments