Breaking News

सोमंथळीतील करंज पुल स्लॅब कामाची अभियंत्याकडून पाहणी ; चांगल्या दर्जाचे काम करण्याचे आदेश

Engineer inspects Karanj bridge slab work in Somanthali; Orders to do good quality work

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.५ मार्च २०२६ - सोमंथळीतील करंज ओढ्यावरील नव्या पुलाचा स्लॅप कोसळला ; ठेकेदाराच्या निकृष्ट कामावर नागरिकांचा संताप, या मथळ्याखाली दैनिक गंधवार्ताने वृत्त प्रकाशीत केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रविंद्रकुमार अंबेकर व त्यांच्या पथकाने त्वरीत घटनास्थळी धाव घेतली व संबंधित ठेकदाराला निकृष्ठ दर्जाच्या कामाबद्दल चांगलेच सुनावले. तसेच चांगल्या दर्जाचे काम करण्याचे आदेश दिले.

    सोमंथळी ता फलटण येथील करंज ओढ्यावरील पुलाच्या बांधकामाला मुहूर्त मिळत नव्हता परंतु काही दिवसांपुर्वी या पुलाच्या कामाचा शुभारंभ झाला. व कॉक्रीटीकरनाच्या कामाला सुरूवात झाली. परंतु ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे पुलाचा कॉक्रीटीकरनाचा स्लॅब कोसळल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले. पुलाचे काम सुरू असतानाच पुल कोसळत असेल तर इतर पुल कश्या स्थितीत होईल  याबाबत चर्चेला उधाण आले.  या पुलाचे टिकाऊ व दर्जेदार काम व्हावे यासाठी कित्येक वर्षापासुन परिसरातील नागरिकांनी संघर्ष केला होता. संबंधित पुलाचे चांगल्या क्लॉलीटीचे बांधकाम करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.

No comments