Breaking News

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी ई-केवायसी दुरुस्त करण्याचे आवाहन

Chief Minister appeals to beneficiaries under Majhi Ladki Bahin Yojana to correct e-KYC

    सातारा :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत दि.31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या "कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/ कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे " याबाबतचा पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे. अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन e-KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी 31 मार्च पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

    त्यानुसार ज्या लाभार्थी महिलांची e-KYC प्रक्रिया पूर्ण करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे अशा महिलांनी सदर योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर e-KYC दुरुस्ती करण्यात यावी, असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले आहे.

No comments