Breaking News

शासन आपल्या दारी मोहिमेच्या यशाने विरोधकांना पोटशूळ - आ. सचिन पाटील

The government has given the opposition a headache with the success of its door-to-door campaign - MP Sachin Patil

    फलटण गंधवार्ता वृतसेवा दि ११ - तुम्ही मला मोठ्या विश्वासाने तुमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवले असल्याने सर्व विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन तुमच्या गावात येऊन, तुमच्या अडचणी सोडविणे माझे कर्तव्य आहे. यामुळे मी फलटण तालुक्यातील गावागावात जाऊन तुमच्या अनेक वर्षांच्या महसूल, एमएसइबी,भूमी अभिलेख,नीरा उजवा कालवा तसेच पोलिस प्रशासन यांच्या कडील अडचणी सोडवत असताना, ही मोहीम होऊ नये यासाठी विरोधकांनी वैफल्यग्रस्त होऊन, तुमची होणारी किंवा मार्गी लागणारी कामे थांबविण्याचा खोडसाळपणा करीत आहेत, शासन आपल्या दारी मोहिमेच्या यशाने विरोधकांना पोटशूळ  उठत असल्याची टीका आमदार सचिन पाटील यांनी शिवसेना गटावर केली.

    शासन आल्या दारी या मोहीम अंतर्गत सुरू असलेल्या दौऱ्यावर असताना ते जिंती व साखरवाडी येथील झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील,प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, विक्रमसिंह भोसले,नायब तहसीलदार तुषार गुंजवटे तसेच महसूल,एमएसइबी,भूमी अभिलेख,नीरा उजवा कालवा,तसेच पोलिस प्रशासन अन् इतर विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    तुम्ही फक्त लोकांना झुलवत ठेवण्याचे काम आत्तापर्यंत केले, मात्र मी गेली एक वर्षे झाली लोकांच्यात जाऊन त्यांच्या गावात जात आत्तापर्यंत रेकॉर्डब्रेक असे पाणंद रस्ते खुले केले आहेत, मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला शेतकऱ्यांची अडीअडचणी माहीत आहेत,आज उजवा कालवा अंतर्गत येणाऱ्या भागातील शेत जमिनी अती पाण्याच्या वापराने नापीक झाल्या आहेत, त्याचबरोबर उत्पन्न कमी झाले आहे,तसेच शंभर एकरचा बागायतदार दहा एकर वरती आला अन् दहा एकर वाला शेतकरी  एकर वर आला, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे, यामुळे आता शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे गरजेचे असल्याचे मत आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केले.

    विरोधकांना लोकांची कामे करायची माहितीच नाही, त्यामुळे मी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाऊन लोकांची अनेक वर्षे रखडलेली कामे करीत असताना, मोठा पोटशूळ उठत आहे,मात्र तुम्ही कितीही बोम मारली अन् कामात आडकाठी आणली तरी लोकांची कामे करायची आहेत त्यामुळे मला त्यांची नावे सुद्धा घ्यायची नाहीत मी माझी कामे करीतच राहणार त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले. यावेळी या बैठकीत जिंती,खुंटे,फडतरवाडी,साखरवाडी, पिंपळवाडी,होळ या भागातील हजारो नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या या मधील अनेक समस्या आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांनी जागेवरच सोडविल्या तर अनेक विषयांवर संबंधित अधिकारी तसेच ग्रामपंचायती चे अधिकारी यांना सूचना देत त्या ताबडतोब सोडवा असे निर्देश दिले यावेळी संबंधित गावातील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments