दुधेबावी येथे कृषिदुतांनी दिली पिक कर्जाबद्दल माहिती
फलटण प्रतिनिधी - दुधेबावी ता.फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड व पिक कर्ज याबद्दल माहिती सांगितली.
दुधेबावी ता. फलटण येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.दुधेबावी मध्ये कृषिदुतांनी भेट दिली व शेतीविषयक कर्ज व पिक कर्ज योजनेबद्दल माहिती घेतली.
कृषिदुतांनी कर्जाबद्दल जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती सांगितली. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज फ़ॉर्म भरण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी तेथे शाखाप्रमुख श्री एस. एस.यादव , तसेच बँकेतील इतर कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत रामराजे कुलाळ, अभिषेक मोरे, ऋषिकेश ओंबासे, रोहित वाघमारे, झहीर मणेरी, श्रीराम मोहिते, प्रणव साळुंखे यांनी हा उपक्रम राबवला.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, समन्वयक प्रा. एन. एस. ढालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. ए. पंडित, प्रा. जी .बी.अडसूळ यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments