अवैध दारुचे गुत्ते बंद न झाल्यास २६ जानेवारीला आत्मदहन - संग्राम अहिवळे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ - फलटण शहर पोलिस स्टेशन हद्दीत बेकायदेशिर दारु विक्रि होत असुन, यामुळे कित्येक संसार उध्वस्त होत आहेत, हे अवैध दारुचे गुत्ते बंद न झाल्यास दि. २६ जानेवारी २०२६ रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा संग्राम श्रीकांत अहिवळे यांनी दिला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या अर्जात संग्राम अहिवळे यांनी असे म्हटले आहे की,फलटण शहर पोलिस स्टेशन हद्दीत बेकायदेशिर दारु विक्रि होत असुन कित्येक महिलांचे संसार यामुळे उध्वस्थ होत आहेत. त्यांची मुल अनाथ होउन देशोधडिला लागत आहेत. या अवैध्य दारु विक्रि मुळे गुंडगिरी वाढत चललेली आहे. त्यामुळे हे सर्व रोखणं काळाची गरज बनलेली आहे.
तरी येणाऱ्या १ जानेवारी २०२६ पासुन नविन वर्षात हे दारु व्यवसायाचे गुत्ते बंद करावेत हि नम्र विनंती. जर दि १ जानेवारी रोजी दारु गुत्ते बंद न झाल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आत्मदहन करणार असल्याचा इशारा संग्राम अहिवळे यांनी दिला आहे.

No comments