फलटण नगराध्यक्ष पदाची निवडणूक दुरंगी तर नगरसेवक पदाच्या लढती दुरंगी - तिरंगी
(फलटण गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ -फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नगराध्यक्ष पदाकरिता थेट लढत श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध समशेर सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर अशी होत असून या कडे फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष वेधले जाणार आहे.
दरम्यान आज माघारी च्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी 25 जणांनी माघार घेतली असून, काही ठिकाणी दुरंगी आणि तिरंगी लढत होत असून या लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले जाणार आहे. खऱ्या अर्थाने विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेकडून तसेच माजी खासदार स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव तथा माढा लोकसभेचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर हे भाजपाकडून निवडणुकीला उभे ठाकले असून, यामध्ये खऱ्या अर्थाने श्रीमंत रामराजे विरुद्ध माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर अशीच होणार आहे. ही निवडणूक अनेक अर्थाने गाजणार असून या लढतीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.
दरम्यान आज शेवटच्या दिवशी २५ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. आता निवडणूक रिंगणात पुढील लढती होतील.
प्रभाग क्रमांक १ अ मध्ये लक्ष्मी प्रमोद आवळे (शिवसेना) चव्हाण अपूर्वा प्रथमेश (अपक्ष) लोंढे अस्मिता भीमराव (अपक्ष) पवार नर्मदा किसन (अपक्ष) अशी लढत होईल. प्रभाग १ ब मधून पवार सुमन सुरेश (शिवसेना), जाधव सोमा गंगाराम अपक्ष, पवार देविदास किसन (अपक्ष) अशा लढती होणार आहेत.
प्रभाग २ अ मधून मीना जीवन काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), आरती जय रणदिवे,(शिवसेना),अहिवळे सोनाली संग्राम अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे.
प्रभाग 2 ब मधून सुपर्णा सनी अहीवळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), अनिकेत राहुल अहिवळे (शिवसेना), कुणाल किशोर काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)अशी तीरंगी लढत होणार आहे.
प्रभाग क्रमांक ३ अ मध्ये सचिन रमेश अहिवळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), पूनम सुनील भोसले (शिवसेना), सिद्धार्थ दत्ता अहिवळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), आशय हणमंत अहिवळे अपक्ष अशी चौरंगी लढत होईल, 3ब मधून सुलक्षणा जितेंद्र सरगर (भाजपा), सुषमा हेमंत ननावरे (शिवसेना) अशा लढती होणार आहे.
प्रभाग क्रमांक ४ अ मधून रूपाली सुरज जाधव (शिवसेना), हेमलता चंद्रकांत नाईक भाजपा प्रभाग ४ ब मधून अझरुद्दीन ताजुद्दीन शेख (शिवसेना) राहुल जगन्नाथ निंबाळकर (भाजपा), अशी दुरंगी लढत होईल.
प्रभाग क्रमांक ५ अ मध्ये कांचन दत्तराज व्हटकर भाजप , सुरेखा श्रीकांत व्हटकर शिवसेना,खंदारे योगेश्वरी मंगेश(शिवसेना उबाठा) तसेच ब मधून रोहित राजेंद्र नागटिळे भाजप, विजय हरिभाऊ लोंढे पाटील शिवसेना,शुभांगी मुकुंद गायकवाड (शिवसेना उबाठा)अशी तीरंगी लढत होईल.
प्रभाग क्रमांक ६ मधून किरण देविदास राऊत भाजप विरुद्ध दीपक अशोक कुंभार शिवसेना व ब मधून मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर भाजप विरुद्ध अमिता सदाशिव जगदाळे शिवसेना अशी दुरंगी लढत होईल.
प्रभाग क्रमांक ७ मधून श्रीदेवी गणेश कर्णे (शिवसेना)विरुद्ध स्वाती राजेंद्र भोसले (भाजप)व तावरे लता विलास शिवसेना (उबाठा), ब मधून अशोक जयवंत जाधव भाजप विरुद्ध पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे शिवसेना अशी दुरंगी जोरदार टक्कर होणार आहे.
प्रभाग क्रमांक ८ मध्ये फिरोज शहनवाज आत्तार भाजप विरुद्ध विशाल उदय तेली शिवसेना दुरंगी लढत होईल. ब मधून शहा सिद्धाली अनुप भाजप विरुद्ध खानविलकर सुवर्णा अमरसिंह शिवसेना विरुद्ध निंबाळकर शितल धनंजय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी तिरंगी लढत होणार आहे.
प्रभाग क्रमांक ९ अ मध्ये मेटकरी रजिया मेहबूब राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध कविता श्रीराम मदने अपक्ष राजेगट पुरस्कृत व मंगल अतुल मोहोळकर अपक्ष अशी तिरंगी लढत होईल. प्रभाग ९ ब मधून भोईटे अमोल प्रकाश राष्ट्रवादी काँग्रेस,पवार पंकज चंद्रकांत राष्ट्रीय काँग्रेस, कदम सुरज हिंदुराव अपक्ष, सचिन चंद्रकांत गानबोटे अपक्ष अशी चौरंगी लढत होणार आहे.
प्रभाग क्रमांक १० अ मध्ये रेहाना बशीर मोमीन भाजप विरुद्ध श्वेता किशोर तारळकर शिवसेना विरुद्ध अपक्ष भुजबळ जयश्री रणजीत अशी तिरंगी लढत होणार आहे. ब मध्ये भोईटे अमित अशोक विरुद्ध शिरतोडे गणेश सूर्यकांत विरुद्ध गायकवाड मोनिका महादेव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी तिरंगी लढत होईल.
प्रभाग क्रमांक ११ अ मध्ये चोरमले संदीप दौलतराव भाजप विरुद्ध चोरमले कृष्णाथ मल्हारी शिवसेना विरुद्ध अपक्ष अमीर गनीम शेख अशी तिरंगी लढत होणार आहे. ११ ब मध्ये निकम प्रियांका युवराज विरुद्ध भोसले प्रियदर्शनी रणजीतसिंह अशी दुहेरी काटेकी टक्कर होणार आहे.
प्रभाग क्रमांक १२ अ मध्ये अरुण हरिभाऊ खरात भाजप विरुद्ध काकडे विकास वसंतराव शिवसेना विरुद्ध पाटोळे ओम प्रकाश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी तिरंगी लढत होईल. ब मध्ये शहा स्मिता संगम शिवसेना विरुद्ध फुले स्वाती हेमंत भाजप विरुद्ध पवार नताशा रोहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी तिरंगी लढत होणार आहे.
प्रभाग क्रमांक १३ अ मध्ये मोहिनी मंगेश हेंद्रे भाजप, बागवान सानिया फिरोज कृष्णा भीमा विकास आघाडी, शेख पाकीजा अमीर अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे. ब मध्ये रूपाली अमोल सस्ते भाजप विरुद्ध काकडे निर्मला शशिकांत अपक्ष राजेगट पुरस्कृत अशी दुरंगी लढत होईल। प्रभाग क्रमांक १३ क मध्ये सूर्यवंशी बेडके सचिन सुभाषराव बेडके अपक्ष राजेगट पुरस्कृत विरुद्ध निंबाळकर राहुल अशोक राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शेडगे मनोज दत्तात्रय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी तिरंगी लढत होणार आहे.

No comments