Breaking News

डॉक्टर युवती केसला वेगळा रंग देण्याचा विरोधकांचा डाव - सुषमा अंधारे व जयश्री आगवणे यांना मास्टर माईंडची फूस -दिलीपसिंह भोसले

Opposition's plot to give a different color to the case of a young doctor - Sushma Andhare and Jayashree Agavane are the mastermind's deception - Dilipsinh Bhosale

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २९ ऑक्टोबर २०२५ - डॉक्टर युवतीने स्वतः दि.२३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १.२३ मिनिटांनी हॉटेलवर येऊन रुमची मागणी केली, ती युवती सज्ञान असल्यामुळे आम्ही तीला रूम दिली, यावेळी त्या डॉक्टर युवतीने स्वतःआपले आधार कार्ड देत, तशी रजिस्टर वर नोंद केली, त्यानंतर एक वाजून 30 मिनिटांनी हॉटेलच्या रूम मध्ये डॉक्टर युवती गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच वाजेपर्यंत बाहेर आले नाहीत, हॉटेल मॅनेजमेंट ला संशय आल्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून दुसऱ्या चावीने रूमचे दार उघडले असता त्या महिला युवतीने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले, गेली बत्तीस वर्षांपासून हॉटेल मधुदीप फलटण करांच्या सेवेत आहे, अद्याप अशी कोणतीही दुर्घटना झाली नाही, दुर्दैवाने त्या डॉक्टर युवतीने आत्महत्या केली त्यात आमच्या कुटुंबाचा किंवा हॉटेल मधुदीप मॅनेजमेंट चा काहीही संबंध नसताना केवळ राजकारण करून आम्हाला बदनाम करण्यासाठी आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असून आम्ही त्याचा निषेध करतो सुषमा अंधारे व जयश्री आगवणे यांना फुस लावणारा व मार्गदर्शन करणारा मास्टरमाइंड वेगळाच असल्याचे दिलीपसिंह भोसले यांनी स्पष्ट केले.

    हॉटेल मधुदीप व भोसले कुटुंबावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी, त्या मयत डॉक्टर युवतीच्या मृत्यूप्रकरणात त्यांच्यावर आरोप केले होते, त्याला उत्तर देण्यासाठी भोसले यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी तेजसिंह भोसले,रणजितसिंह भोसले उपस्थित होते.

    यावेळी बोलताना भोसले यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात अंधारे यांना काही राजकीय नेते  मदत करत आहेत, एका कार्यक्रमात  मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माझा  एकत्र फोटो दाखवून, या प्रकरणात आमचा सहभाग असल्याचे भासवले जात आहे,त्या विरोधकांनी आत्तापर्यंत कोरेगाव पॅटर्न झाला, माण पॅटर्न झाला, त्यात त्यांच्या हाताला काहीच सापडले नाही, त्यामुळे आता त्यांनी फलटण पॅटर्न राबविण्याचा केविलवाणा प्रकार केला आहे, मात्र या प्रकरणात राजकारण करून आम्हाला गोवण्याचा तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील सुरू असलेला फलटण तालुक्यात विकास यांच्या डोळ्यात खुपत आहे असा टोला विरोधकांना लगावत, मी नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकडे मागणी केली आहे, मात्र मी तिकीट मिळाले तरच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहे, त्याचबरोबर गेली तीस वर्षे फलटण तालुक्याचा विकास झाला नसल्याने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला, त्यामुळे विरोधकांकडून राजकारण सुरू आहे. मात्र त्या प्रकरणात आमचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करीत मी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खांद्याला खांदा लावून फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला अपेक्षित विकासासाठी कटीबद्ध असल्याचे दिलीपसिंह भोसले यांनी सांगत, सुषमा अंधारे यांच्या आरोपाला उत्तरे देत आमचा या डॉक्टर युवतीच्या मृत्यूप्रकरणात कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

No comments