Breaking News

संग्राम अहिवळे यांच्याकडून शाळा क्र.३ ला सबमर्सिबल पंप भेट

Sangram Ahivale gifts submersible pump to School No. 3

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ जुलै २०२५ - मंगळवार पेठ फलटण येथील फलटण नगर परिषद शाळा क्र 3 ला युवा उद्योजक संग्रामदादा अहिवळे व सोनू संग्राम अहिवळे यांच्याकडून सबमर्सीबल पंप भेट म्हणून देण्यात आला, या मदतीसाठी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी मुकाडे सर यांनी आभार त्यांचे मानले.

    युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सोनू अहिवळे यांनी शाळेची पाहणी केली व शाळेच्या डिझीटलायझेशनचे व संपूर्ण शाळा व्यवस्थापनाचे कौतुक केले इथून पुढे शाळेला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले. 

    कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक  बालाजी मुकाडे सर, उपशिक्षक हिरामण मोरे सर, बंडू यादव सर, शिवाजी जाधव सर, महिला शिक्षक चैत्राली कांबळे, अंगणवाडी सेविका सारिका काकडे, अंबिका काकडे, प्रिती रणजित रोकडे, युवा नेतृत्व रोहित ( भैय्या ) माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे मा.अध्यक्ष सागर अहिवळे, युवा उद्योजक विशाल गुंजाळ, तेजस भोसले, मुकुल अहिवळे, रवी मोरे, आदित्य साबळे, संतोष (दादा) कांबळे, तुषार कोकाटे, गणेश काकडे, गणेश पवार, प्रकाश काकडे, मोनू कोकाटे, सोहम जगताप, जीत जगताप, निखिल काकडे, प्रशांत  अहिवळे, आर्यन काकडे, नीरज लगाडे, अनुज काकडे, मुस्ताक कोतवाल , माऊली काकडे, समद कोतवाल, रुद्र लगाडे, दादा काकडे, केतन अहिवळे, निरंजन अहिवळे, सम्यक काकडे, अझीम शेख तसेच परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते. 

    शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. बालाजी मुकाडे सर यांनी संग्राम (दादा) अहिवळे व सोनू संग्राम अहिवळे यांचा सत्कार केला व उपशिक्षक हिरामण मोरे सर यांनी आभार मानले.

No comments