पोस्ट ऑफीसचे 4 ऑगस्ट रोजी व्यवहार बंद राहणार
सातारा दि.२8: प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्मकडे सुरळीत आणि सुरक्षित संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी ४ ऑगस्ट २०२५ रोजी नियोजित डाऊनटाईम ठेवण्यात आले आहे. या दिवशी कोणतेही पोस्टल व्यवहार पोस्ट ऑफिसमध्ये होणार नाहीत, अशी माहिती वरिष्ठ अधिक्षक डाकघर यांनी दिली आहे.
एटीपी अॅप्लिकेशनचा उद्देश सुधारित वापरकर्ता अनुभव, जलद सेवा वितरण आणि अधिक ग्राहक-स्नेही इंटरफेस प्रदान करणे आहे, जो अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि भविष्यातील डाकसेवा देण्याच्या भाग आहे. तरी ग्राहकांनी आपल्या भेटीचे पूर्वनियोजन करावे, असे आवानही करण्यात आले आहे.
No comments