Breaking News

नायलॉन मांजा विरोधात फलटण पोलिसांची कारवाई; जाधववाडी रस्त्यावरील मैदानात रीळ जप्त

Phaltan police take action against nylon fishing nets; Reel seized in Jadhavwadi road field

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) – आज दि. २१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी फलटण शहर पोलीस ठाण्याच्यावतीने नायलॉन मांजा विरोधात विशेष गस्त राबवण्यात आली. यावेळी जाधववाडी रोडवरील साई मंदिर समोरील मैदानात काही मुले पतंग उडवत असल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनास आले.

    पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या दोऱ्याची तपासणी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहचताच, ती मुले रीळ सोडून पळून गेली. त्या ठिकाणी एक नायलॉन दोऱ्याची आणि एक साध्या दोऱ्याची रीळ आढळून आली. पोलिसांनी दोन्ही रीळ जप्त करून पोलीस ठाण्यात नोंद केली असून, संबंधित मुलांचा शोध सुरू आहे.

    ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्री. अंकुश इवरे, महिला पोलीस नाईक दीपाली अलगुडे व महिला पोलीस शिपाई प्रियांका नरुटे यांच्या पथकाने केली.

    नायलॉन दोऱ्यामुळे दरवर्षी अनेकजण जखमी होतात, अपघात होतात, तसेच पक्षांनाही जीव गमवावे लागतात. त्यामुळे नायलॉन दोऱ्याच्या वापरास बंदी असून, फलटण पोलीस या प्रकारावर ड्रोनच्या सहाय्याने देखील लक्ष ठेवत आहेत.

    फलटण पोलीसांनी सर्व नागरिक व पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या मुलांकडून नायलॉन दोऱ्याचा वापर तर होत नाही ना, याची जबाबदारीने खात्री घ्यावी. जनजागृतीसाठी पोलीस विविध उपक्रम हाती घेत असून, नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

No comments