Breaking News

फलटण अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड करण्यावर भर- श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Phaltan Engineering College focuses on selecting students for jobs in multinational companies - Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. १३ जुलै २०२५ - फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण येथील विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आणखी एक सोनेरी पान जोडले गेले आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांची नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये (MNCs) चांगल्या पॅकेजेससह निवड झाली आहे, ज्यामुळे त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशावर आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड करण्यावर दिलेल्या विशेष भर यावर हे यश अधोरेखित होते.

    महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ वार्षिक पॅकेजेससह नोकरी मिळवली आहे.

    मेकॅनिकल विभाग: जयकुमार राठोड यांची सिमेन्स लिमिटेड (Siemens Limited) मध्ये १६ लाख रुपये वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे. रोहित भांडवलकर, तेजस कापसे आणि रेणुका चव्हाण यांची जॅक्सन जनरेटर (Jackson Generator) मध्ये प्रत्येकी ५ लाख रुपये वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे.

    सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग: पूजा ठोंबरे यांची एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड मध्ये ४ लाख रुपये, ओंकार अनपट यांची एल अँड टी कन्स्ट्रक्शन लिमिटेड (L&T Construction Limited) मध्ये ५ लाख रुपये, तर शिवतेज नाईक निंबाळकर यांची इंडस प्रमोटर (Indus Promoter) मध्ये ८ लाख रुपये वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे.

    इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग : रेशमा दडस यांची वंडरलँड इंडस्ट्रीज (Wonderland Industries) मध्ये १० लाख रुपये, सायली मुळीक, अभयसिंह नाळे आणि वैशाली लोणकर यांची इन्फोसिस (Infosys) मध्ये प्रत्येकी ५ लाख रुपये वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे.

    कम्प्युटर विभाग: साहिल साळवे यांची एमटेक प्रायव्हेट लिमिटेड (Mtech Private Limited) मध्ये ५ लाख रुपये, विवेक पिसाळ यांची अकोलाईट डिजिटल (Acolyte Digital) मध्ये ८ लाख रुपये आणि स्वरांजली भोसले यांची अटोस प्रायव्हेट लिमिटेड (Atos Private Limited) मध्ये ४ लाख रुपये वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे.

    या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि प्रशासन अधिकारी अरविंद निकम सर यांनी अभिनंदन केले आहे.

    फलटण एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे नॅक (NAAC) 'ए' मानांकन प्राप्त महाविद्यालय असून, डिप्लोमामध्येही एन. बी. ए. (NBA) मानांकन प्राप्त कोर्सेस आहेत. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीने महाविद्यालयाची मान उंचावली आहे. ही निवड विद्यार्थ्यांची कठोर मेहनत, महाविद्यालयाचे उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण आणि प्लेसमेंट सेलच्या विशेष प्रयत्नांचे फळ आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांनी केले.

No comments