Breaking News

वडले येथे ट्रान्समिशन लाईनचा ६ लाखांचा कंडक्टर चोरीस

Transmission line conductor worth Rs 6 lakh stolen in Wadley

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. १३ जुलै २०२५ - फलटण तालुक्यातील वडले येथील ट्रान्समिशन लाईनच्या साईटवरून सुमारे ६ लाख रुपये किंमतीचा एएल 59 झेब्रा कंडक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी टाटा प्रोजेक्ट्स लि. मुंबई या कंपनीत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

    फिर्यादी राहुल श्रीकांत सोनालीकर वय 40 वर्षे व्यवसाय नोकरी (खाजगी) सध्या रा. बारामती ता. बारामती जि. पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीकडून वडले ते शिक्रापूर दरम्यान ट्रान्समिशन लाईनचे काम सुरू आहे. गेले दोन महिने वडले येथे तो काम पाहत होता. दिनांक ६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता एका शेतकऱ्याने फोन करून कंडक्टरची तार तुटून खाली पडल्याची माहिती दिली. त्यानंतर अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता सुमारे १००० मीटर लांबीचा कंडक्टर गायब असल्याचे निदर्शनास आले.

    या चोरीमध्ये  एएल 59 झेब्रा कंडक्टर 1000 मीटर लांबींचा, इन्सुलेटर, फिटिंग सेट, डंपर सेट व इतर साहित्य यांचा समावेश आहे. प्राथमिक अंदाजानुसार नुकसान ६ लाख रुपयांच्या घरात आहे.

No comments