तडीपार गुंड स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद ; 6 पिस्टल, 6 मॅक्झिन, 30 काडतुसे, मोबाईल -15 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ जून २०२५ - खंडाळा तालुक्यातील लोणंद नीरा रोडवर असणाऱ्या रेल्वे पुलावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन तडीपार गुंडांना अटक केली आहे . त्यांच्याकडून सहा पिस्टल ,सहा मोकळ्या मॅक्झिन , 30 जिवंत काडतुसे मोबाईल व कार असा 15 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . अमित उर्फ बिऱ्या रमेश कदम वय 32 राहणार लोणी तालुका खंडाळा विशाल महादेव चव्हाण वय 30 राहणार भोळी तालुका खंडाळा अशी या गुंडांची नावे आहेत .
आगामी बकरी ईद व संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तडीपार इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे . त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मोक्यातून जामीनावर सुटलेले दोन तडीपार गुंड लोणंद निरा रस्त्यावर शस्त्र विक्रीसाठी एका कारमधून येणार असल्याची माहिती मिळाली होती .अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे आणि त्यांच्या पथकाने येथील रेल्वे पुलावर सापळा रचला व कार क्रमांक एम एच बारा टी एस 1889 या गाडीला अडवून पोलिसांनी गुंडांना ताब्यात घेतले .
त्यांच्याकडून सहा देशी बनावटीची सहा पिस्टल, सहा मोकळ्या मॅक्झिन 30 जिवंत काडतुसे दोन मोबाईल हँडसेट व कार असा पंधरा लाखांची हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .लोणंद पोलीस ठाण्यामध्ये अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी तसेच तडीपाडीचा भंग केले बाबत भारतीय हत्यार अधिनियम कलम ३( १ ) २५नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे
या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक परितोष दातिर, विश्वास शिंगाडे, अतिश घाडगे,विजय कांबळे, शरद बेबले , निलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे,अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ ,अमित माने, अरुण पाटील, अविनाश चव्हाण,स्वप्निल कुंभार,गणेश कापरे, मोहन पवार, ओंकार यादव,विक्रम पिसाळ, विशाल पवार ,रोहित निकम, पृथ्वीराज जाधव,सचिन ससाणे, रविराज वर्णेकर,तसेच लोणंद पोलीस ठाण्याचे नाना भिसे, अतुल कुंभार, सायबर पोलीस स्टेशनचे यशवंत घाडगे यांनी कारवाईत भाग घेतला होता.
No comments