शिवसेनेच्या युवासेना फलटण तालुका प्रमुख पदी सुभाष पवार
गोखळी ( गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ जून २०२५ - कराड येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात, शिवसेनेच्या युवासेना फलटण तालुका प्रमुख पदी सुभाष पवार यांची निवड करण्यात आली. पर्यटन माजी सैनिक कल्याण मंत्री,पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते पवार यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे जिल्हाप्रमुख चंद्रकांतदादा जाधव ,राष्ट्रीय एस टी कर्मचारी सेना सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले, सहसंपर्कप्रमुख तुकाराम ओंबाळे, तालुका प्रमुख नानासो ऊर्फ पिंटूशेठ ईवरे यांची उपस्थिती होती.
फलटण तालुक्यातील गाव तेथे शिवसेना शाखा, घर तेथे शिवसैनिक म्हणून काम करण्यासाठी माझी निवड झाली, मी शिवसैनिक म्हणून तालुक्यामध्ये शिवसेना घराघरात पोहोचविण्यासाठी काम करणार आहे, माझ्यावर पक्षाने सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
No comments