बीबीए, बीसीए साठी पुनर्प्रवेश परीक्षा - बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या साठी सुवर्णसंधी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ जून २०२५ - बीबीए व बीसीए या व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी सीईटी देणे बंधनकारक आहे. तथापी बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेची माहिती नसल्यामुळे परीक्षा देता आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षेची मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री प्रा. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये मान्य करण्यात आली असून, पुनर्परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले व तदनुसार महाराष्ट्र शासनाने ही परीक्षा परत घेण्याचे निश्चित केले असून, या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा मुधोजी महाविद्यालयातील आय. टी. व मॅनेजमेंट विभागात करण्यात आली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना बीबीए, बीसीए साठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी त्वरित नोंदणी करावी असे आवाहन मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक @99220 11001प्रा.सचिन लामकाने
@99603 55949 प्रा. सचिन दोशी.
No comments