बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १० जून २०२५ - फलटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर तातडीने हालचाल करत मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निरा उजवा कालव्याच्या अधीक्षक अभियंत्याकडून ६ पोकलेन मशीन उपलब्ध करून घेतल्या. या मशीनच्या सहाय्याने बाणगंगा नदी व परिसरातील ओढ्यांची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या स्वच्छतेमुळे बाणगंगा नदी पहिल्यांदाच पूर्णपणे स्वच्छ झाली असून, तिचे रुपडेच पालटले आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्यात वारंवार निर्माण होणारी पूरस्थिती टाळण्यासाठी आणि नदीकाठच्या वस्तीतील नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी खासदार निंबाळकर यांनी केलेले हे प्रयत्न कौतुकास्पद ठरले असल्याचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी सांगितले.
या कार्यामुळे मलठण व फलटण शहरातील शनीनगर, शुक्रवार पेठ, भैरोबा गल्ली, बुधवार पेठ व मंगळवार पेठ येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. "पावसामुळे दरवर्षी पाणी घरात घुसण्याची भीती असायची, पण यंदा नदी स्वच्छ झाल्याने ही चिंता कमी झाली आहे," अशी भावना व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी रणजितसिंह यांचे आभार मानले असल्याची माहिती माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली.
No comments