Breaking News

रामचंद्र भिवाजी काळे यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025

Ramchandra Bhiwaji Kale to be conferred with Rajarshi Shahu National Honor Award 2025

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १८ जून २०२५ -  रामचंद्र भिवाजी काळे मु. पो. वडले ता. फलटण जि. सातारा यांना मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दीक्षा चैरिटेबल ट्रस्ट तर्फे राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

    रामचंद्र भिवाजी काळे यांचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय असे दखलपात्र कार्य पाहून मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दीक्षा चैरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर तर्फे त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार-२०२५ या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि पुस्तके असे असून या पुरस्काराचे वितरण रविवार दि. २९ जून, २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

No comments