Breaking News

लुंबिनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप

Lumbini Multipurpose Institute felicitates students and distributes school supplies

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १८ जून २०२५ - लुंबिनी बहुउद्देशीय संस्था, मंगळवार पेठ, फलटण यांच्या वतीने रविवार, दिनांक १५ जून २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, मंगळवार पेठ, फलटण येथे १० वी व १२ वी परीक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

    कार्यक्रमात १० वी व १२ वी मध्ये उच्च गुण प्राप्त केलेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना विशेष बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात आली. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

    "कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांनी केलेल्या प्रगतीवरूनच मी मोजतो." या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणादायी विचारानुसार समाजातील उच्चशिक्षित महिलांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

    प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रियदर्शिनी सावंत, दीपाली आबाजी गायकवाड, प्रतीक्षा सागर अहिवळे, सुनंदा किशोर काकडे आणि पराग भीमराव लोंढे ,अनिकेत दीपक काकडे,शीतल अहिवळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

    प्रमुख अतिथी म्हणून सुपर्णा सनी अहिवळे, वैशाली सुधीर अहिवळे, सचिन रमेश अहिवळे, सनी संजय अहिवळे आणि दत्ता फणस अहिवळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

    या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुणाल किशोर काकडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सदस्य – सुरज काकडे, शिवेंद्र कांबळे, सागर काकडे, शंतनु काकडे, सागर भोसले, सुशांत काकडे, श्रीकांत मोरे, हेमंत काकडे, अजय जगताप, प्रतीक काकडे, वैभव काकडे व मयुर माटे यांनी विशेष मेहनत घेतली.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली कांबळे यांनी केले. कार्यक्रमास पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी लुंबिनी बहुउद्देशीय संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

No comments