Breaking News

नाईकबोमवाडी एमआयडीसी संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली - २० हजार युवकांना रोजगाराची नवी संधी

An important meeting regarding Naikbomwadi MIDC was held

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ जून २०२५ : उद्योग मंत्रालय, मुंबई येथे दि.५ जून रोजी नाईकबोमवाडी एमआयडीसी संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार मा. सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

    या बैठकीमध्ये फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी येथे मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. लवकरच या भागात मोठा उद्योग प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यामार्फत सुमारे २० हजार स्थानिक तरुण बेरोजगार व भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

    या बैठकीत विविध क्षेत्रातील नामवंत उद्योजकांशी थेट चर्चा करून त्यांना फलटणमध्ये उद्योग सुरू करण्याचे आमंत्रण देण्यात आले. उद्योजकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच प्रकल्प कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले. आजपर्यंत सातत्याने चालू असलेल्या पाठपुराव्यास अखेर यश मिळाले असून, फलटण तालुक्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ही ऐतिहासिक घडी ठरली आहे.

    या बैठकीस उद्योग मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, एमआयडीसी अधिकारी, धनंजय साळुंखे पाटील, जयकुमार शिंदे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.

No comments