Breaking News

आयुक्तांनी केली फलटण तालुक्यातील पालखीतळांची पाहणी

Commissioner inspects palakhitals in Phaltan taluka

      फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ जून २०२५ - श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा प्राधान्याने पुरवा. तसेच पालखी सोहळ्यास वाहतुकीची अडचण येऊ देऊ नका. सेवेमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही यासाठी सर्व विभागांनी समन्वयातून कामे करा, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

    श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण तालुक्यात 27 ते 29 जून दरम्यान तीन दिवस तरडगाव, फलटण, बरड मुक्कामी आहे . मुक्कामाच्या ठिकाणांची व सेवा सुविधांच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार  आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील,जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, जिल्हा परिषद सीईओ याशनी नागराजन, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, मुख्याधिकारी निखिल मोरे, गटविकास अधिकारी कुंभार, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य, जल जीवन नगरपालिका  यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी  तरडगाव, फलटण, बरड येथील पालखी तळास भेट देऊन सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला.  पालखी सोहळ्या दरम्यान वाहतूक नियोजन योग्य प्रकारे करण्याच्या तसेच वाहतुकीला कोणत्याही प्रकारे रस्ता अडथळा ठरणार नाही अशा प्रकारचे नियोजन करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास जाणीवपूर्वक दिल्या. आळंदी पंढरपूर वारी मार्गाच्या अपूर्ण कामाविषयी माहिती घेऊन वारीस अडथळा येणार नाही अशा प्रकारचे नियोजन करण्याची सूचना महामार्गाचे संबंधित अधिकारी कदम यांना देण्यात आल्या. फलटण येथील प्रशस्त पालखीतळ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. बरड येथील पालखीतळाच्या सपाटी करणाच्या कामाचाही आढावा घेतला.

No comments