राजे गटाच्या दुधेबावी माजी सरपंचसह अनेक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ जून २०२५ - माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजे गटाचे दुधेबावी ग्रामपंचायतचे मा सरपंच भाऊसाहेब मोरे व त्यांचे सहकारी सचिन मोरे तानाजी मोरे, संतोष मोरे, मनोज मोरे सर,सनी मोरे, समीर मोरे, लक्ष्मण मोरे, योगेश मोरे या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, कोळकी मंडल अध्यक्ष लक्ष्मण सोनवलकर, पंचायत समिती माजी सदस्य सचिन रणवरे, युवा नेते नानासाहेब आडके, मा. सरपंच त्रिंबक सोनवलकर , उत्तमराव सोनवलकर , संतोष सोनवलकर भाऊसाहेब सोनवलकर व गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर म्हणाले की, दुधेबावी ग्रामस्थांना संपूर्ण विकास कामासाठी सहकार्य केले जाईल तसेच या भागातील कोणताही प्रश्न प्रलंबित ठेवणार नाही अशी ग्वाही दिली.
यावेळी बोलताना भाऊसाहेब मोरे यांनी सांगितले की, फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर हे सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा सर्व गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे व गावांमधील जे काही उर्वरित प्रमुख कार्यकर्ते लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
No comments