Breaking News

नगरपरिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

Students welcomed with cheers at the Municipal Council School

      फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ जून २०२५ - श्रीमंत लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर  नगर परिषद शाळा नंबर ८ डेक्कन चौकाजवळ,फलटण येथे आज दिनांक १६ जून २०२५ रोजी नवीन शालेय वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शाळेत सामील करून घेण्यात आले.

    याप्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे तसेच गणवेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  निखिल मोरे, उपमुख्याधिकारी  तेजस पाटील, शिक्षण मंडळ लिपिक नितीन खाडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. इंदुताई पाहुणे मॅडम यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवे शैक्षणिक वर्ष यशस्वी जावो, अशा शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिक्षकांनी मुलांचे मनोबल वाढवण्यासाठी खेळ, गीत, शुभवाक्य व फुगे यांचा वापर करत स्वागत केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन वर्षाबाबत उत्साह निर्माण झाला असून, शाळेच्या गुणवत्तेचे व शिस्तबद्ध वातावरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments