Breaking News

फलटण तालुक्यातील ४९ सामाजिक कार्यकर्त्यांचा सुधारक सन्मान पुरस्काराने सन्मान

49 social workers from Phaltan taluka honored with Reformer Honor Award

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ जून २०२५ - महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा अंतर्गत ओम साई लोकसंचलीत साधन केंद्र व ज्ञानज्योती लोकसंचलीत साधन केंद्र यांच्या वतीने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास कार्यक्रम, जेंडर न्यूट्रिशन या घटकांतर्गत,  फलटण तालुक्यातील ४९ सामाजिक कार्यकर्त्यांचा सुधारक सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

    फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालय येथे,  तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत, महिला बचत गट, महिला सक्षमिकरण,  स्त्री पुरुष समानता  या विशेष उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन,  सुधारक सन्मान पुरस्कार २०२४-२५  ने   फलटण तालुक्यातील ४९ गावांमधील सामाजिक कार्यकर्ते यांचा सुधारक सन्मान पुरस्काराने गुणगौरव सन्मानित करण्यात आला.

    या कार्यक्रमाचे  प्रस्ताविक ज्ञानज्योती लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक आबासाहेब कोळेकर यांनी केले तर  कार्यक्रमाचे स्वागत भाषण महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा सातारा जिल्हा समन्वयअधिकारी सौ शोभा कुलकर्णी यांनी केले.

    या वेळी बोलताना डॉ. अभिजीत जाधव तहसीलदार फलटण यांनी  संस्थेच्या उल्लेखनीय कामाबद्दल लोकसंचालित साधन केंद्राचे कौतुक केले, तसेच पुढील काळामध्ये अशा कार्यक्रमातून लोकांमध्ये स्त्री-पुरुष समानता जागृती होऊन त्या कुटुंबाचे  राहणीमान विचार, उत्पन्न वाढली पाहिजे. 

    पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती फलटणचे फाळके सर, पोलीस उपविभागीय फलटण निर्भया पथक प्रमुख सौ.पानसरे मॅडम व वाल्हेकर  मॅडम यांनी उपस्थितांना शासकीय योजना,शासकीय कायदे, याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी  लेखाधिकारी  जमने मॅडम,  फलटण तलाठी संघटना अध्यक्ष लक्षण अहिवळे,फलटण तलाठी संघटना सचिव  देठे उपस्थित होते.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम साई लोक संचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सौ शीला घाडगे यांनी केले.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शसुशांत चोरमले, उपजीविका सल्लागार ओम साई लोकसंचालित साधन केंद्र यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ पूजा अडसूळ लेखापाल , सहयोगिनी आशा धुमाळ, रेखा जगताप, सोनाली पाटोळे दिपाली मोरे, शुभांगी धुमाळ, सोनम शिंदे,शैला चव्हाण, उषा चव्हाण, वैशाली मोरे यांचे मोलाचे योगदान लाभले.

No comments