Breaking News

जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले

Two corona patients were found in the district

    सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० मे २०२५ - महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सातारा जिल्ह्यात आज दि. २९ मे रोजी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी दिली.

    क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात १ आणि सह्याद्री रुग्णालयात १ असे एकूण २ रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही रुग्णांवर उपचार  सुरु असून दोघांची प्रकृती चांगली आहे.

    सातारा जिल्ह्यात चार वर्षापूर्वी कोरोनाने थैमान घातले होते. आजमितीस कोरोनाची लाट यापूर्वी होती तशी जरी नसली तरी खबरदारी म्हणून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने थंडी, ताप, जुलाब अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी लक्षणे दिसताच तात्काळ उपचार घ्यावेत, वेळेत उपचार घेतल्यास रुग्ण तात्काळ बरा होत असल्याचे डॉ. युवराज करपे यांनी सांगितले.

No comments