सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद – श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २३ मे २०२५ - विध्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य देणे महत्वाचे आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे काम नगरसेवक सनी अहिवळे , सोनिया माजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुपर्णा अहिवळे या करीत आहेत हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगतानाच आपण फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वैयक्तिक पातळीवर सहकार्य करणार असल्याचे पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर केले.
सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा . नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार समारंभात बोलत होते. याप्रसंगी सेवानिवृत्त वॉरंट ऑफिसर जे . एस . काकडे , मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य रवींद्र येवले , आरपीआयचे जेष्ठनेते विजय येवले , माजी नगरसेवक , मधुकर काकडे , माजी नगरसेवक सनी अहिवळे , सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ . सुपर्णा अहिवळे , विकास काकडे सर , सेवानिवृत्त अधिकारी सुहास अहिवळे , पत्रकार सचिन मोरे , प्राचार्य ॲड . वर्धमान अहिवळे , महेश पाटील , जय रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
आम्ही गेली १२ वर्ष सलगपणे ८ वी ते १० वी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करीत असून, हे कार्य म्हणजे आपण समाजाला काही देणे लागतो, या भावनेतून आम्ही यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप व साहित्य शालेय साहित्याचे वाटप करत असतो, सध्या शालेय साहित्य वितरणाचा कार्यक्रम हा मोठ्या स्वरूपात सुरू करण्यात आला आहे, पुढील काळात आमच्या या कार्याला सर्व घटकानी मदत करावी असे आवाहन माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनी केले.
याप्रसंगी जे . एस . काकडे , रवींद्र येवले , विजय येवले , मधुकर काकडे , विकास काकडे पत्रकार सचिन मोरे , प्राचार्य ॲड . वर्धमान अहिवळे , महेश पाटील , आदींची ‘ समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हरिश आप्पा काकडे यांनी केले तर आभार सौ . सुपर्णा अहिवळे यांनी मानले.
कार्यक्रमास संग्राम अहिवळे, सिद्धार्थ अहिवळे, विशाल पाटील, स्वप्निल मोरे यांच्यासह मंगळवार पेठ येथील मान्यवर उपस्थित होते.
No comments