Breaking News

फलटण शहर व ग्रामीण भागातील पुरपरिस्थितीचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून भरपावसात आढावा ; कार्यकर्त्यांना मदतीचे निर्देश

Ranjitsinh Naik Nimbalkar reviews the flood situation in Phaltan city and rural areas during heavy rains

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ मे २०२५ : फलटण शहर आणि ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा आणि आपत्कालीन व्यवस्थेचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भरपावसात आढावा घेतला व, बाधित नागरिकांना प्रत्येक स्तरावर तातडीने मदत पोहोचवण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना तसेच प्रशासनास दिले.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरी भागात झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पावसामुळे झालेल्या घरांचे, रस्त्यांचे आणि इतर नागरी सुविधांचे नुकसान पाहून त्यांनी त्वरित मदतीसाठी प्रशासनाशी समन्वय साधण्याचे आश्वासन दिले. पाहणी दौऱ्यात त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत निर्देश दिले की, बाधित नागरिकांना प्रत्येक स्तरावर तातडीने मदत पोहोचवावी. कोणतीही मदत थांबू नये यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

या पाहणी दौऱ्यात फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. सचिन पाटील, चेअरमन अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर यांच्यासह भाजपा महायुतीचे पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या दौऱ्यामुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचा विश्वास जनतेत निर्माण झाला आहे.

No comments