फलटण तालुक्यात संततधार पाऊस ; घरांची पडझड ओढ्याला पूर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - फलटण तालुक्यात आज दिवसभर संततधार पाऊस सुरू असून, तालुका प्रशासनाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज दुपारपर्यंत झालेल्या पावसामुळे तालुक्यात भिललकटी व आदर्की खुर्द येथे घराची पडझड होऊन नुकसान झाले आहे तसेच फलटण दहिवडी रोडवर भाडळी येथील ओढ्याला पूर आल्याने रस्त्याची वाहतूक काही काळ ठप्प होती.
आदर्की खुर्द येथील श्री कांतिलाल जाधव यांच्या जुन्या घराची भिंत पडली आहे. तर भिलकटी येथील श्री प्रदीप गणपत कांबळे यांच्या राहत्या घराची भिंत पडली आहे. दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नाही.
प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत जाधव यांनी दिली.
No comments