Breaking News

चांडाळ चौकडी फेम 'रामभाऊ' डॉक्टरेट पदवीने सन्मानित

Chandal Quartet Fame 'Rambhau' Honored with Doctorate Degree

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २ मे २०२५ - चांडाळ चौकडीसारख्या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे, तसेच सामाजिक विषयांवर प्रभावी प्रबोधन करणारे हरहुन्नरी कलाकार श्री. रामदास सखुबाई सदाशिव जगताप उर्फ 'रामभाऊ' यांना "ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड" या विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

    गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ रामदास जगताप  यांनी आपल्या अभिनयकौशल्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे काम केले आहे. शिक्षण, पर्यावरण, स्त्री-सक्षमीकरण, व्यसनमुक्ती अशा अनेक विषयांवर त्यांनी रंगभूमी व माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे.

    या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    रामदास जगताप यांनी हा सन्मान संपूर्ण समाजासाठी असल्याचे नमूद करत, भविष्यातही असेच कार्य चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments