बांधकाम कामगार कल्याणकारी योजना फलटण तालुक्यात प्रभावीपणे राबवा - ना. आकाश फुंडकर
फलटण : फलटण तालुक्यात बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेंतर्गत कामगारांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी बांधकाम कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांची भेट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे आणि युवा नेते धनंजय साळुंखे पाटील यांनी घेतली.
मंत्री आकाश फुंडकर यांनी यावेळी फलटण तालुक्यात योजना प्रभावीपणे राबवावी, कामगारांना या योजनांचे लाभ सुलभपणे मिळतील तसेच सर्व अडचणी सोडवण्याचे आश्वासन देऊन, "हे सरकार गोरगरीबांचे आहे व योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे," असे सांगितले.
दरम्यान, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माहिती दिली की, लवकरच बांधकाम कामगार संघटना व लाभार्थ्यांसाठी भव्य भांडी वाटप व शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे.
No comments