आम्ही राजे गटाच्या पाठीशी - प्रभाग क्र.१२ मधील नागरिकांनी दिली ग्वाही ; माजी नगरसेविका दिपाली निंबाळकर यांच्यासह महिला, युवकांची उपस्थिती
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.६ - प्रभाग क्रमांक १२ मध्ये विविध ठिकाणी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठका संपन्न झाल्या, याप्रसंगी माजी नगरसेविका दिपाली निंबाळकर यांच्यासह महिला, युवकांनी लक्षणीय उपस्थिती दर्शवून, आम्ही राजे गटाच्या पाठीशीच खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली.
आढाव बैठकीदरम्यान श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, १९९१ पासून हा परिसर श्रीमंत रामराजे यांच्या पाठीशी उभा आहे. राजे गटावर प्रेम करणारी बहुसंख्य लोक या भागात राहतात, या भागातील विकास कामांची पूर्तता बऱ्यापैकी झाली असून, काही प्रलंबित विकास कामे आहेत, त्यात आम्ही स्वतः लक्ष घालून, ती कामे करून घेऊ अशी ग्वाही यावेळी दिली.
प्रभाग क्रमांक १२ मध्ये श्रीमंत संजीवराजे नगर, हडको कॉलनी, गोळीबार मैदान, महाराजा मंगल कार्यालय परिसर, जुनी स्टेट बँक कॉलनी, विद्यानगर, लक्ष्मी नगर आदी भागात झालेल्या आढावा बैठकीदरम्यान, प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, प्रमुख कार्यकर्त्यांच्या श्रीमंत संजीवराजे यांनी भेटी घेतल्या. यावेळी श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, मोहनराव नाईक निंबाळकर, भोजराज नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रमोद निंबाळकर, प्राचार्य गंगावणे सर, अनिल शिरतोडे, सौ दिपाली निंबाळकर,फिरोज बागवान, शैलेश रसाळ, सी डी पाटील, अमरसिंह नाईक निंबाळकर, शिवराज नाईक निंबाळकर, अरुण पवार, धीरज कचरे, अजित शिंदे, पै. दत्तात्रय शिंदे, श्रीकांत साळुंखे सर, गणेश शीरतोडे, मिलिंद सहस्रबुद्धे, राहुल नाईक निंबाळकर, अमित कदम, आकाश कदम यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
No comments