छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एकतर्फी बाजी मारली ; 1 लाख 42 हजार 124 मताधिक्याने विजय
सातारा - दिनांक 23 प्रतिनिधी - सातारा जावली विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अपेक्षेप्रमाणे एकतर्फी बाजी मारली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार अमित कदम यांचा छ. शिवेंद्रसिंहराजे यांनी एक लाख 42 हजार 124 अशा राज्यातील नंबर एकच्या मताधिक्याने पराभव केला आमदार छ. शिवेंद्रसिंह राजे यांना एक लाख 76 हजार 849 मध्ये मिळाली तर विरोधी उमेदवार अमित कदम यांना 34,725 मते मिळाली .
आमदार छ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विक्रमी विजयामुळे सातारा व जावळी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला .साताऱ्यात ठीक ठिकाणी आया हे राजा लोगो रे लोगो या गाण्यांवर कार्यकर्त्यांनी ताल धरत जल्लोषी मिरवणुका काढल्या येथील येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधील शासकीय गोदामामध्ये सकाळी साडेआठ वाजल्यापासून 20 टेबलांवर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली .निवडणूक निरीक्षक वंदना वैद्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत सुधाकर भोसले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत कोळेकर अभिजीत बापट सतीश बुध्दे या निवडणूक यंत्रणेच्या देखरेखीखाली मतमोजणीला सुरुवात झाली सुरुवातीला एकूण 2807 टपाली मतदान मोजण्यात आले सकाळी नऊ वाजल्यापासून प्रत्यक्ष ईव्हीएम च्या मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्या फेरीतच आमदार शिवेंद्रसिंह राजे यांना 4314 तर अमित कदम यांना 1062 मते मिळाली पहिल्या फेरीतच आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी तीन हजार बहात्तर मतांचे लीड घेतले पहिल्या फेरीमध्येच लीड झाल्याने गोडाऊनच्या बाहेर बाबाराजे समर्थकांचा जल्लोष सुरू झाला टप्प्याटप्प्याने दर पंधरा मिनिटाला फेरीनिहाय निकाल जाहीर होऊ लागले दुसऱ्या फेरीमध्ये आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी 7613 मतांचे लीड घेतले त्यानंतर प्रत्येक फेरीनिहाय त्यांनी आपले मताधिक्य वाढवत नेले पहिल्या पाच फेरीमध्ये बाबाराजांचे लीड साडेसात हजार मतांपासून 15000 मतांपर्यंत वाढत गेले तेव्हाच शिवेंद्रसिंह राजे यांचा विजय निश्चित झाला होता मात्र किती मताधिक्याने ती येणार याची केवळ औपचारिकता बाकी होती सुरुवातीला जावळी त्यानंतर सातारा त्यानंतर सातारा शहर आणि सातारा ग्रामीण अशा चार टप्प्यांमध्ये मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक फेरीमध्ये साडेदहा हजाराचे मताधिक्य शिवेंद्रसिंह राजे यांनी घेत आपला विजयाचा वारू चौफेर उधळवला.
त्या तुलनेने विरोधी उमेदवार अमित कदम यांना मतदारांनी म्हणावी तशी साथ दिली नाही प्रत्येक फेरीमध्ये त्यांना अडीच हजार ते साडेपाच हजार अशी मते वाढत गेली मात्र रंगतदार लढतीसाठी ती पुरेशी नव्हती आमदार शिवेंद्रसिंह राजे यांचे 10 ते 21 या फेरी दरम्यान विक्रमी मताधिक्य वाढत गेले प्रत्येक फेरीचे निकाल प्रांत सुधाकर भोसले यांच्याकडून दर पंधरा मिनिटांनी जाहीर करण्यात येत होते दुपारी साडेबाराच्या नंतर गोडाऊन परिसर सातारा शहर आणि जावळी तालुका येथे फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली दुपारी साडेबाराच्या दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे आपल्या कार्यकर्त्यांच्या सह मतमोजणी केंद्रात उपस्थित झाले प्रांत सुधाकर भोसले यांनी अंतिम फेरीचा निकाल दुपारी एक वाजता जाहीर केला यामध्ये शिवेंद्रसिंह राजे यांना एक लाख 76 हजार 849 इतकी मते मिळाली तर अमित कदम यांना 34 हजार 725 मते मिळाली निकालाचे अंतिम चित्र स्पष्ट होतात शिवेंद्रसिंह राजे यांना एक लाख 42 हजार 124 मतांचे राज्यातील नंबर एकचे विक्रमी मताधिक्य मिळाले कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत यावेळी एकच जल्लोष केला.
लक्षवेधी बाब म्हणजे नोटाला 2419 मते मिळाली अन्य उमेदवारांचा आढावा घेतला असता मिलिंद कांबळे यांना 1161 बबन करडे यांना 27 72 शिवाजी भगवान माने यांना 606 अभिजीत बिचुकले यांना 529 गणेश जगताप यांना 504 व कृष्णा भाऊराव पाटील यांना 516 मते मिळाली एकूण दोन लाख वीस हजार पाचशे सात मतांपैकी दोन लाख 17 हजार 62 मध्ये वैध ठरली तर 426 मते तांत्रिक कारणास्तव बाद झाली त्यानंतर प्रांत सुधाकर भोसले यांच्या हस्ते आमदार छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आमदारकीचे प्रमाणपत्र अदा करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आमदार शिवेंद्रसिंह राजे यांना उचलून खांद्यावर घेतले व तिथून त्यांची जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली.
No comments