Breaking News

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे फलटण तालुक्यात सरहद्द ओढा येथे स्वागत

welcome of Mauli's Palkhi ceremony at Sarhad Odha in Phaltan Taluka

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ जुलै २०२४ - श्री संतश्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण तालुक्यात "सरहद्द ओढा" येथे आगमन झाल्यानंतर आ.दिपकराव चव्हाण साहेब व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मनोभावे स्वागत केले. याप्रसंगी दत्ताबापू अनपट, डी.के. पवार, डेप्युटी इंजिनिअर मठपती साहेब, प्रवीण खताळ, कोरेगाव सरपंच सुनील शिंदे, कापडगाव सरपंच अर्चना गेजगे, कुसुर सरपंच दादासो नरुटे, महादेवराव माने, पराग भोईटे इनामदार,वैभव खताळ,  शरद खताळ, सुरेश चव्हाण, मनोज चव्हाण, शैलेश भोईटे, संजय चव्हाण, अजित भोईटे, गरुड रावसाहेब, काळे रावसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

    लोणंद मधून आपला अडीच दिवसाचा मुक्काम संपवून पालखी सोहळा तरडगावच्या दिशेने निघाला, सरहद्द ओढा, कापडगाव येथे फलटण तालुक्याचे वतीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आमदार दीपकराव चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते वारकऱ्यांना खाद्यपदार्थाचे वाटप करण्यात आले.

No comments