Breaking News

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म उपलब्ध ; महिलांनी लाभ घ्यावा - अनुप शहा

Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana form available; Women should benefit - Anup Shah

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म दि.४ जुलै पासून प्रभाग क्रमांक १० व ११ मधील नागरिकांसाठी शुक्रवार पेठ येथील संपर्क कार्यालयात ठेवण्यात येणार असून,  जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांनी केले आहे.

    अनुप शहा यांच्या शुक्रवार पेठ येथील संपर्क कार्यालयात दिनांक 4 जुलैपासून महिलांना या योजनेसाठी मोफत फॉर्म भरून देण्यात येणार आहेत, ज्या महिलांना फॉर्म भरावयाचे असतील त्यांनी, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला,  फोटो या कागदपत्रांसह उपस्थित राहून, फॉर्म भरायचा आहे. या योजनेचा फायदा प्रत्येक महिलेला  पंधराशे रुपये मानधन प्राप्त होणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा फायदा घ्यावा.

 

No comments