Breaking News

प्रचार बंद ; राजकीय पक्ष व उमेदवारांनी आचारसंहितेची काटेकोर अमंलबजावणी करावी - जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी

campaign closed; Political parties and candidates should strictly implement the code of conduct - District Election Officer Jitendra Dudi

    सातारा 5:-  - सातारा व माढा लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि. 7 मे रोजी  मतदान होणार आहे.  भारत निवडणूक आयोगाने 48 तास अगोदर प्रचार बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आज रविवार दि. 5 मे रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्रचार पूर्णपणे बंद करावा, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

    प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणास प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे. त्याचे दखील सर्वांनी काटेकोरपने पालन करावे. प्रिंट मिडीयामधून मतदानपूर्व दिवस व मतदान दिवस या दोन दिवशी देण्यात येणाऱ्या राजकीय जाहिराती एमसीएमसी समितीचे पूर्व प्रमाणिकरण असल्याशिवाय प्रसिद्धीस देवू नये, असे निर्देशही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. डुडी यांनी दिले आहेत.

No comments