Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील लोकांचे प्रेरणास्त्रोत - ॲड. राजू भोसले

Dr. Babasaheb Ambedkar is the source of inspiration for the people of the world - Adv. Raju Bhosale

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुलामांना , उपेक्षितांना,  महिलांना व सर्व जाती धर्मातील लोकांना संविधानाच्या माध्यमातून मूलभूत अधिकार देऊन बादशहा सारखे जगण्याचे अधिकार दिले त्यांचे शिक्षण व त्यांचे विचार आभ्यासणाऱ्या जगातील लोकांचे बाबासाहेब आंबेडकर प्रेरणास्त्रोत आहेत असे प्रतिपादन ॲड. राजू भोसले यांनी केले.

    हिंगणी ता. माण  येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये  ॲड. राजू भोसले बोलत होते यावेळी प्रा. लक्ष्मण हाके ,  आण्णासाहेब  कोळी ,  भारत सरतापे , आदेश सरतापे , बाळासाहेब सरतापे ( गुरुजी) सुग्रीव चव्हाण अंजली सरतापे, संगीता सरतापे, लीलाबाई सरतापे, काळेल मॅडम , केंद्रे सर हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी पुढे बोलताना ॲड. राजू भोसले म्हणाले ,  बाबासाहेबांनी सर्व धर्माच्या भारतीय महिलांना धर्मग्रंथांनी सुद्धा न दिलेले स्थान संविधानाच्या माध्यमातून दिले आहे. आज महिला शिक्षण घेऊन न्यायाधीश , जिल्हाधिकारी , पोलिस अधिकारी , प्राध्यापक सहज होत आहेत. त्याचबरोबर  राष्ट्रपती , पंतप्रधान , राज्यपाल,  सभापती या  देशातील उच्च पदावर महिला सहज विराजमान होत आहेत. पुरुषांच्या बरोबरीने काम करून समान वेतन घेत आहेत. हीच मोठी मूलभूत अधिकाराचे देणगी संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांनी महिलांना दिली आहे परंतु काही महिला कर्मकांड व अंधश्रद्धा यामध्ये आपले आयुष्य वाया घालवत आहेत.  महिलांनी व युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून शिक्षण घेऊन समाजात सत्ता , संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवून सामाजिक स्तर उंचावणे गरजेचे आहे.

    यावेळी सुरेश सरतापे, दत्ता सरतापे, विकास सरतापे, ज्ञानदेव सरतापे, दिपक सरतापे, ग्रामपंचायत सदस्य लालासो सरतापे, सहदेव सरतापे, गुलाब सरतापे, तात्यासो सरतापे, मारुती सरतापे, विश्वास सरतापे, महावीर सरतापे या प्रमूख कार्यकर्त्यांसहित बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब सरतापे गुरुजी यांनी केले. सूत्रसंचालन आदेश सरतापे यांनी केले व आभार भारत सरतापे यांनी मानले.

No comments