Breaking News

फलटण तालुक्यातील दोघांना केले दोन वर्ष तडीपार

Two years of imprisonment were given to two people from Phaltan taluka

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करण्याकरिता सरावलेल्या बिबी ता.फलटण येथील ०२ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता सातारा जिल्ह्यातून तडीपार केले आहे. दरम्यान नोव्हेंबर २०२२ पासुन म.पो.का. कलम ५५ प्रमाणे १९ उपद्रवी टोळयांमधील ६३ इसमांना, म.पो.का.कलम ५६ प्रमाणे १७ इसमांना व म.पो.का. कलम ५७ प्रमाणे ०२ इसमांना असे एकुण ८२ इसमांचे विरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आले आहे. आणि भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.

    सातारा जिल्हयामध्ये फलटण तालुक्यातील फलटण ग्रमिण पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) किरण रमेश आवारे, वय २० वर्ष, रा. बिबी, ता. फलटण, जि. सातारा. २) कुमार लालासो काकडे, वय २१ वर्ष, रा. बिबी, ता. फलटण, जि. सातारा यांचेवर जबरी चोरी करणे, दरोड्याची तयारी करणे, दुखापतकरून शिविगाळ दमदाटी करून विनयभंग करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने, फलटण ग्रामिण पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक श्री. सुनिल महाडीक यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. राहुल आर. धस, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांनी केली होती.

    टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर वेळोवेळी त्यांचेवर अटक, प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही, अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसुन, ते सातत्याने गुन्हे करीत होते, तसेच त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्याने, त्यांचा लोकांना फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता, अशा इसमांवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती. वरील टोळीबाबत समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवुन, त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

    हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक तानाजी माने, पो. हवा. प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण ग्रामिण पोलीस ठाणेचे पो. हवा. वैभव सूर्यवंशी, पो.ना. श्रीनाथ कदम यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

No comments