Breaking News

ऊसातील बिबट्या' या विषयावर जनजागृती कार्यक्रम संपन्न

Public awareness program on 'Leopard in sugarcane' was concluded

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   - विडणी ता.फलटण.जि.सातारा येथे "ऊसातील बिबट्या" या विषयासंदर्भात दि.२६ फेब्रुवारी२०२४ रोजी जनजागृती कार्यक्रम वनविभाग,फलटण आणि नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी,फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.  आजच्या काळात बिबट्या हा वन्यप्राणी जंगलातील राहिलेला नसुन ऊस या पिकामधे राहणारा बनला आहे. त्यामुळे मानवाला या वन्यजीवासोबत एक शेजारी म्हणुन जगणे हाच पर्याय आहे, ज्यातून आपण भविष्यातील मानव-वन्यजीव संघर्ष टाळु शकतो व समजात या विषयी एक आदर्श निर्माण करु शकतो असा संदेश या जनजागृती कार्यक्रमात देण्यात आला.

    कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र आधिकारी रगतवान सर,वनपरिमंडळ आधिकारी कुंभार सर व वनरक्षक लवांडे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

No comments